30.6 C
Latur
Tuesday, January 19, 2021
Home फक्त मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग कोरोनाला रोखू शकते

फक्त मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग कोरोनाला रोखू शकते

एकमत ऑनलाईन

शास्त्रज्ञांचा दावा, केवळ ‘या’ गोष्टीमुळं कमी होऊ शकतात ‘कोरोना’चे 80 % रुग्ण

नवी दिल्ली : एका अलीकडील वैज्ञानिक अभ्यासाचा असा दावा आहे की कोरोना विषाणूची 80 टक्के प्रकरणे विशेष उपायांनी कमी केली जाऊ शकतात. वैज्ञानिकांच्या आंतरराष्ट्रीय संघाने या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक नवीन मॉडेल्सचा प्रयोग केला आहे, त्यापैकी एका गोष्टीचे त्यांनी सर्वात प्रभावी म्हणून वर्णन केले आहे. या काळात संपूर्ण जग हे हळूहळू लॉकडाउन उघडण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, अशा परिस्थितीत वैज्ञानिकांच्या दाव्याचा लोकांना उपयोग होऊ शकतो.

नवीन आकडेवारीनुसार इतिहास आणि विज्ञान कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी एका गोष्टीवर सहमत आहेत आणि ते म्हणजे मास्क घालून सोशल डिस्टेंसिंगची काळजी घेणे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार विषाणूविरुद्ध मास्क लावण्याच्या प्रभावीतेवर बऱ्याच चर्चेनंतर व्हाईट हाऊसने अखेर आपल्या सर्व कर्मचार्‍यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. त्याच वेळी, अध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर काम करणारे इतर सर्व नेते आधीपासूनच मास्क परिधान करत होते.

Read more  CAPF च्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये १ जूनपासून फक्त स्वदेशी उत्पादनं

हा अभ्यास कॅलिफोर्निया विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संगणक विज्ञान संस्था आणि हाँगकाँगच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संशोधन आणि वैज्ञानिक मॉडेलवर आधारित आहे. अभ्यासाचे मुख्य संशोधक डॉ. डेकाई वू म्हणतात की मास्क लावण्याच्या अत्यावश्यकतेचा आधार वैज्ञानिक मॉडेल आणि त्याची गरज आहे.

अभ्यासानुसार, 6 मार्च रोजी जपानमध्ये कोरोना विषाणूमुळे केवळ 21 लोकांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी अमेरिकेत कोरोनामुळे 2,129 लोकांचा मृत्यू झाला, जो जपानमधील मृत्यूंपेक्षा 10 पट जास्त आहे. अमेरिका लॉकडाउन उघडण्याच्या तयारीत आहे, तर जपानमध्ये कधी या पद्धतीने लॉकडाउन लावण्यातच आले नाही. आता जपानमध्येही नवीन प्रकरणे खूप कमी येत आहेत, तर संपूर्ण जगात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. याचे कारण म्हणजे जपानमध्ये आधीपासूनच मास्क घालण्याची संस्कृती आहे.

Read More  चीनमधून २० वर्षांत ४ घातक विषाणू

अर्थशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सहयोगी असलेले पॅरिसचे इकोले डे गुएरे म्हणाले, ‘फक्त मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग ही अशी एकमेव गोष्टी आहे जी कोरोनाला रोखू शकते. कोणतीही लस किंवा औषध मिळत नाही तोपर्यंत आपल्याला अशाप्रकारेच कोरोनाशी संघर्ष करावा लागेल. आंतरराष्ट्रीय पत्रिका व्हॅनिटी फेअरने एका लेखात लिहिले आहे की कोरोना लस तयार होईपर्यंत केवळ मास्क आपल्याला वाचवू शकते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,412FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या